प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना: नवीन कोटा कधी येनार ? राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे, यासाठी शासन सौर ऊर्जेच्या वापराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे. ‘प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना’ आणि ‘मागेल त्याला सोलर’ यांसारख्या उपक्रमांमधून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत देशभरात ४९ लाख सोलर पंप बसवण्याचे भव्य उद्दिष्ट ठेवले असून, त्या दिशेने वेगाने पावले उचलली जात आहेत.
महाराष्ट्राची सद्यस्थिती आणि पंपांचे उद्दिष्ट
सोलर पंप बसवण्याच्या बाबतीत संपूर्ण देशात महाराष्ट्र सध्या आघाडीवर आहे. देशाच्या एकूण कोट्यापैकी जवळपास ४०% कोटा एकट्या महाराष्ट्राला मिळाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रासाठी ५,७५,००० सोलर पंप मंजूर करण्यात आले असून, त्यापैकी ४,६६,७१९ पंपांची उभारणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. अद्यापही सुमारे १,०९,००० पंपांचे इन्स्टॉलेशन होणे बाकी आहे, ज्यासाठी प्रशासकीय स्तरावर नियोजन सुरू आहे.




















