तब्बल 10 वर्षे आकाशात चंद्रच नव्हता…! इतिहासानुसार इसवी सन १११० च्या सुमारास आकाशातून चंद्र अचानक गायब झाला होता. ही घटना काही दिवस किंवा महिन्यांची नव्हती, तर तब्बल १० वर्षे लोकांना आकाशात चंद्राचे दर्शन झाले नाही. त्याकाळी विज्ञानाचा फारसा प्रसार झाला नसल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अनेकांना वाटले की हा देवाचा प्रकोप आहे किंवा जगाचा अंत जवळ आला आहे. या भीषण घटनेमुळे समाजात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा पसरली होती आणि लोकांनी याला एक दैवी संकट मानले होते.
शास्त्रज्ञांनी जेव्हा या घटनेचा सखोल अभ्यास केला, तेव्हा याचे मुख्य कारण ज्वालामुखींचे उद्रेक असल्याचे समोर आले. संशोधकांनुसार, १११४ मध्ये आइसलँडमधील ‘हेकला’ ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता, ज्याला लोकांनी ‘नरकाचा दरवाजा’ म्हटले होते. मात्र, १११० मधील चंद्राच्या गायब होण्याशी त्याचा थेट संबंध जुळत नव्हता. त्यानंतर जपानमधील ‘माउंट आसमा’ या ज्वालामुखीचा ११०८ मध्ये झालेला प्रचंड उद्रेक हे याचे खरे कारण मानले जाते. या उद्रेकातून बाहेर पडलेली राख आणि धूळ वातावरणात इतकी दाट पसरली होती की, तिने चंद्राचा प्रकाश पूर्णपणे रोखून धरला होता.




















