लाडक्या बहिणीचा हप्ता या तारखेनंतरच… मिळनार 4500 रूपये Ladki Bahin Update
लाडक्या बहिणीचा हप्ता या तारखेनंतरच… मिळनार 4500 रूपये Ladki Bahin Update
Read More
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या १० महत्त्वाच्या योजना | Farmer Welfare Schemes
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या १० महत्त्वाच्या योजना | Farmer Welfare Schemes
Read More
30 जूनच्या आत कर्जमाफी नाही केली तर काय कराल ? बच्चु कडू यांचे उत्तर
30 जूनच्या आत कर्जमाफी नाही केली तर काय कराल ? बच्चु कडू यांचे उत्तर
Read More
मान्सून 2026 चा अंदाज ; दुष्काळ की सुकाळ, पहा तोडकर यांचा अंदाज
मान्सून 2026 चा अंदाज ; दुष्काळ की सुकाळ, पहा तोडकर यांचा अंदाज
Read More
लाडकीचा हप्ता या तारखेनंतरच…मिळनार 4500 रूपये
लाडकीचा हप्ता या तारखेनंतरच…मिळनार 4500 रूपये
Read More

फुले ऊस १५००६ : सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन देणाऱ्या नवीन वाणाचे सविस्तर वैशिष्ट्ये

पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेले, खोडव्यासाठी उत्तम आणि क्षारयुक्त जमिनीसाठी उपयुक्त वान

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फुले ऊस १५००६ हे वाण अधिक ऊस आणि साखर उत्पादन देणारे एक नवीन आणि प्रभावी वाण म्हणून समोर आले आहे. पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेल्या या वाणाची प्रमुख वैशिष्ट्ये, उत्पादन क्षमता आणि लागवडीसाठीची शिफारस खालीलप्रमाणे विस्तृतपणे मांडली आहे.

ADS किंमत पहा ×

वाणाची ओळख आणि विकास

फुले ऊस १५००६ हे वाण जास्त ऊस आणि जास्त साखर उत्पादन देणारे, मध्यम पक्वता गटातील आहे. महाराष्ट्रातील पाडेगाव संशोधन केंद्राने हे वाण विकसित केलेले आहे. या वाणाची उगवण क्षमता आणि उत्पादन क्षमता क्षार व चोपण जमिनीमध्ये देखील अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळाली आहे. या वाणाची पार्श्वभूमी तपासल्यास, हे वाण फुले ०२६५ आणि को ९४०१२ या दोन वाणांच्या संकरामधून बनवलेले आहे. विशेष म्हणजे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे झालेल्या ५२ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीत या वाणाला सुरू, पूर्व हंगामी आणि अडसाली या तिन्ही हंगामांसाठी लागवडीची शिफारस करण्यात आलेली आहे.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment