राज्यात थंडीचा कडाका कायम, पण ‘या’ भागात ढगाळ वातावरणाची शक्यता ; प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी २१ डिसेंबर २०२५ रोजी राज्याचा नवा हवामान अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, राज्यात २१ ते २३ डिसेंबर दरम्यान काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवेचे प्रमाण जास्त असेल. मात्र, शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, कारण या ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडणार नसून केवळ हवेत गारवा आणि थंडीचा जोर वाढणार आहे.
३० डिसेंबरपर्यंत थंडीची तीव्र लाट राज्यात ३० डिसेंबरपर्यंत पावसाची कोणतीही शक्यता नाही, परंतु थंडीची तीव्र लाट कायम राहणार आहे. नाशिक, निफाड आणि परभणी यांसारख्या सखल भागात थंडीचा जोर अधिक जाणवेल. ३० डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार होईल, जे १ जानेवारी २०२६ पर्यंत राहील. हे ढगाळ वातावरण वेलवर्गीय पिके, टरबूज, खरबूज आणि ऊस उगवणीसाठी अत्यंत पोषक ठरणार आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांना नवीन लागवड करायची आहे, त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर असेल.




















